देशाला श्वास हवा आहे! सेंट्रल विस्टा प्रकल्पावर राहुल गांधींचा निशाणा | पुढारी

देशाला श्वास हवा आहे! सेंट्रल विस्टा प्रकल्पावर राहुल गांधींचा निशाणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना महारोगराईचा  उद्रेक सुरूच आहे. विविध राज्यातील रूग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

अधिक वाचा : उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीमुळे तब्बल ७०० शिक्षकांचा कोरोनाने बळी!

‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असे ट्वीट त्यांनी केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. या ट्विटमध्ये एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरु असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

अधिक वाचा : एवढचं बाकी होतं! ई-पाससाठी ‘डोनाल्ड ट्रम्प’ आणि ‘अमिताभ बच्चन’ यांच्या नावाचा वापर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारकडे योग्य नियोजन नसल्याचे सांगत राहुल गांधींनी टिकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून रविवारी मोदी सरकारवर टीका केली. कोरोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. अशात देशातील कोरोनास्थिती संबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अधिक वाचा :  पीएम मोदींच्या चुकीला माफी होऊ शकत नाही; चुकांची जबाबदारी घ्यावी; ‘लॅन्सेट’मध्ये टीका

कोरोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे.  दरम्यान शनिवारी राहुल गांधी यांनी जनता के प्राण जाए पर पीएम की टॅक्स वसूली ना जाए असे ट्वीट केले होते. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला होता.

Back to top button