थायलंडच्या काॅलगर्लचा लखनऊमध्ये कोरोनाने मृत्यू; भाजप नेत्याच्या मुलाने बोलावल्याचा आरोप | पुढारी

थायलंडच्या काॅलगर्लचा लखनऊमध्ये कोरोनाने मृत्यू; भाजप नेत्याच्या मुलाने बोलावल्याचा आरोप

लखनऊ ः पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये थायलंडच्या एका मुलीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर”या मुलीला दहा दिवसांपूर्वी राज्यसभेचे भाजपचे खासदार संजय सेठ यांच्या मुलानंच या थायलंडच्या काॅल गर्लला ७ लाख रुपये देऊन बोलावलं होतं”, असा आरोप समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्यानं केला आहे. लखनऊ पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

वाचा ः सिने स्थिरछायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन

सविस्तर वृत्त असं की, लखनऊमधील एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलानं ७ लाख रुपये देऊन थाडलंडमधून काॅल गर्लला बोलावून घेतलं होतं, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून परिसरात होती. १० दिवसांपूर्वीच त्याला बोलाविण्यात आलं आणि यानंतर दोन दिवसांत तिला कोरोनाची बाधा झाली. तिची परिस्थिती आणखीच गंभीर झाली. त्यामुळे थायलंडच्या दूतावासाला याची माहिती देण्यात आली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर पोलिसांकडून या काॅल गर्लच्या संपर्कात आलेल्यांचा पोलिस तपास करत आहेत. 

वाचा ः ‘चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर मी वाचलो असतो’ अभिनेत्याची मृत्यूपूर्वीची पोस्ट व्हायरल

समाजवादी प्रवक्ते आय.पी. सिंह म्हंटलं आहे की, “या थायलंडच्या काॅल गर्लला भाजपचे राज्यसभा खासदार खासदार संजय सेठ यांच्या मुलानचं बोलावलं होतं. जिचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि कारवाई हिंमत आहे का? “, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

Back to top button