कचरा गाडीतून महिलेचा मृतदेह नेला स्मशानभूमीत | पुढारी

कचरा गाडीतून महिलेचा मृतदेह नेला स्मशानभूमीत

शामली : पुढारी ऑनलाईन

कोरोनाबाधितांना वेळीच बेडसह ऑक्सीजन मिळत नसल्याने देशात हजारो जणांना प्राण गमवावा लागत आहे. अनेक राज्यात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा नाही. तर कुठे कब्रस्तानमध्ये कबर नाही असे चित्र आहे. यातच उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ज्यामुळे मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे समोर आले. येथे एका महिलेचा मृतदेह कचरागाडीतून स्मशानभूमीत नगरपालिकेने नेल्याचे उघड होताच उत्तर प्रदेश सरकार आणि शामली नगरपालिकेवर टीका होत आहे. 

अधिक वाचा : उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थिती चिघळली आहे : केंद्रीय मंत्री संतोष गंगवार 

मयत महिलेचे नाव बालामती असून तिचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे तिला खांदा द्यायला चार माणसे देखील मिळाली नाहीत. मयत महिलेचा एकटाच भाऊ घरी होता आणि मृतदेहाला खांदा देण्यासाठी आणखी तीन लोकांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांनी घराजवळील परिसरातील जवळपास अनेक घरात गेले, तिरडीला खांदा देण्यासाठी विनवणी केली. मात्र कोणीही तयार झाले नाही. त्यानंतरच त्यांनी नगरपालिकेला फोन केला आणि माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिकेने शववाहीका न पाठवता कचरागाडी पाठवली. त्यातुनच तो मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. यादरम्यानच कोणीतरी छायाचित्र काढून ते व्हायरल केले. हे चित्रही धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे.

अधिक वाचा : व्हॅक्सिन पॉलिसीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही! केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र 

याबाबत माहिती अशी की, हे प्रकरण शामलीच्या जलालाबाद शहरातील आहे. येथे प्रवास नावाचे एक गरीब बंगाली होमिओपॅथी डॉक्टर राहतात. तर त्यांची बंगालमध्ये राहणारी बहीण बालामती बराच काळापासून आजारी होती. बालामती या अविवाहित असल्याने त्यांची देखभाल करणारे कोणी नाही. त्यावेळी डॉक्टर प्रवास यांनी आपल्या बहिणीला बंगालहून शामली येथे आनले. त्यांच्यावर उपचार केला. परंतु त्यांना वाचवता आले नाही. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.

अधिक वाचा : कवीने भाजपच्या पराभवाचा व्हिडिओ शेअर केला अन् फेसबुकने घातली २४ तासांची बंदी!

यानंतर रविवारी सकाळी त्यांनी आपल्या परिसरातील लोकांना, “माझ्या बहिणीच्या तिरडीला खांदा द्या, तिचे कोरोनामुळे निधन झालेले नाही,” अशी विनंती करत राहिले. मात्र कोणीही तयार झाले नाही. प्रत्येकाला असे वाटतं की, आजकाल बहुतेक लोक हे कोरोनाने मरत आहेत. कदाचित तिलाही कोरोना झाला असावा. यानंतर भाऊ असणाऱ्या डॉक्टर प्रवास यांनी नगरपालिकेला फोन करत बहिणीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यास सांगितले. मात्र नगरपालिकेने  कचरा गाडी पाठवली आणि तो मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला.

अधिक वाचा : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश!

यानंतर शामलीच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी व्हायरल छायाचित्र पाहून एसडीएम व एसीएमओला यांना तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच कोविड कंट्रोल रूमचा नंबर आम्ही खूप व्हायरल करत आहोत. त्याचबरोबर जर रुग्णवाहिका किंवा शववाहनाची गरज भासली असेल तर त्या क्रमांकावर संपर्क साधा. पण डॉक्टर प्रवास यांनी नगरपालिकेला कॉल आणि त्यांनी हे काम केलं आहे. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. अहवाल हाती आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी कौर यांनी सांगितले आहे. 

Back to top button