ऑक्सिजनच्या टँकरचा रस्ता चुकला अन्‌ ७ रुग्णांनी तडफडून प्राण सोडला! | पुढारी

ऑक्सिजनच्या टँकरचा रस्ता चुकला अन्‌ ७ रुग्णांनी तडफडून प्राण सोडला!

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. अनेक राज्यात बेडसह ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे. अशातच हैदराबादमध्ये एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकल्याने ७ कोरोनाबाधितांचा ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने तडफडून मृत्यू झाला. ही घटना हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात उडली.

अधिक वाचा : कचरा गाडीतून महिलेचा मृतदेह नेला स्मशानभूमीत

याबाबत मिळालेली माहिती अशी की, त्या मृत ७ कोरोनाबाधितांवर येथील किंग कोटी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची स्थिती गंभीर होती. यावेळी त्यांना ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने तडफडून मृत्यू झाला. त्यावर रुग्णालय प्रशासनाने, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने पुरवठा होत त्या रूग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन आधीच मागणी केली होती. मात्र टँकरचा रस्ता चुकल्याने त्या ७ जणांचा जीव गेला, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. 

अधिक वाचा : कचरा गाडीतून महिलेचा मृतदेह नेला स्मशानभूमीत

दरम्यान नारयानगुंडा पोलिसांनी टँकरला योग्य रस्त्यापर्यंत सोडण्याचा प्रयत्नही केला. मात्र आधीच उशीर झालेल्या टँकरला रुग्णालयात पोहोचण्यास अधिक उशीर झाला. यामुळे हैदराबादच्या किंग कोटी रुग्णालयासह पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून ऑक्सिजन टँकरला रुग्णालयापर्यंत येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Back to top button