म्युकर मायकोसिसवर  टॅब्लेट तयार; किंमत 200 रुपये | पुढारी

म्युकर मायकोसिसवर  टॅब्लेट तयार; किंमत 200 रुपये

हैदराबाद : वृत्तसंस्था ; कोरोनासोबतच म्युकर मायकोसिसने संकटात भर घातली असून महागड्या उपचारामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी, हैदराबादच्या संशोधकांनी दिलासा देणारे संशोधन केले असून म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) वरील टॅब्लेट विकसित केली आहे. 

अधिक वाचा : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारसाठी मोठी घोषणा

60 मिलिग्रॅमची ही टॅब्लेट केवळ दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे या संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे. ती लवकरच बाजारात येणार आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आर्थिकदृष्ट्याही मोठा दिलासा मिळणार आहे.हे औषध या उपचारात अत्यंत प्रभावी ठरणार आहे. 

अधिक वाचा : लस वितरणाचे कॅग ऑडिट करा : पी. चिदंबरम

विशेष म्हणजे रुग्णांवर अनुकूल परिणाम करणारे आहे. केमिकलचा शरीरावर होणारा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच किडनीवरही ते परिणाम होऊ देत नाही. या संबंधीचे निवेदन आयआयटीने शनिवारी जाहीर केले.हे औषध म्युकर मायकोसिसवर प्रभावी असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाल्याचा दावा रसायन अभियांत्रिकी

अधिक वाचा : ‘७ वर्षांपासून जनता १५ लाखांसाठी थांबलीय, तुम्ही पण थोडा वेळ थांबा’

विभागातील प्रा. सप्तर्षी मजूमदार आणि डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी केला आहे. दोन वर्षांचे प्रयोग आणि त्याच्या परिणामांच्या अभ्यासानंतर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी योग्य अशा फार्मा कंपनीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.

तोंडावाटे करावयाचे उपचार सोपे, गोळ्याची किंमत कमी, उपलब्धताही सहज होण्यासारखी आहे. त्यामुळे आपत्कालीन वापरासाठी तत्काळ या तोंडी औषधाची चाचणी घेण्याची आवश्यकता आहे, असे आयआयटी, हैदराबादने म्हटले आहे.

 

Back to top button