भाजपला मोठा धक्का! १५ नेत्यांनी भाजपला ठोकला रामराम; त्यामागे होतं 'हे' कारण | पुढारी

भाजपला मोठा धक्का! १५ नेत्यांनी भाजपला ठोकला रामराम; त्यामागे होतं 'हे' कारण

लक्षद्विप ः पुढारी ऑनलाईन 

लक्षद्विपमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे १५ नेते आणि इतर कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यामगील कारण असं सांगितलं जातं आहे की, फिल्ममेकर आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आयशा सुल्तानवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये फूट पडली असल्याचं सांगितलं जात आहे. 

वाचा ः लक्षद्वीप प्रशासकांना जैविक शस्त्र म्हणणाऱ्या दिग्दर्शिका आयशा सुल्तानाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा!

सविस्तर माहिती अशी की, लक्षद्विपची पहिली फिल्ममेकर झालेली आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलिस ठाण्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तिच्यावर गुन्हा दाखल होण्यामागे कारण असं होतं की, लक्षद्विपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहून आयशाने टीका केलेली होती. यावर भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद म्हणाले की, “चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि चुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही भाजपच्या पदांचा राजीनामा देत आहोत.”

वाचा ः ‘सलमान खान तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास’, केआरकेनं सल्लूभाईला दिली धमकी

भाजपच्या पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये राज्य सचिव अब्दुल हामिन मुल्लीपुरा, वक्फ बोर्टाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि इतर कार्यकर्त्यांचा सामावेश आहे. अब्दुल खादर यांनी भाजपमधील  १२ नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीची एक पत्र पाठविण्यात आलं आहे, त्यात असं म्हंटलं आहे की, “प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णय जनविरोधी आणि लोकशाही विरोधात जाणारे आहेत. त्याला लोक आता कंटाळेले आहेत.” अशा आशयाचे पत्र त्यांना भाजपकडे पाठविलेले आहे.

Back to top button