पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही, पुढेही ढकलणार नाही | पुढारी

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही, पुढेही ढकलणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

परीक्षार्थी डॉक्टर कोेरोनाकाळात वैद्यकीय सेवेत गुंतलेले असल्याने अंतिम वर्षाची पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा रद्द करावी अथवा लांबणीवर टाकावी, असा आदेश आरोग्य विद्यापीठांना देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

अवकाशकालीन पीठाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी, परीक्षा रद्द करण्यास अथवा पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही आदेश देता येणार नाहीत, असे निकालपत्रातून स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय मंडळाने (एनएमसी) एप्रिल महिन्यातच वैद्यकीय महाविद्यालयांना उद्देशूनकोरोना आढावा घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

‘एम्स’कडून घेण्यात येणारी ‘आयएनआय सीईटी’ परीक्षा महिनाभरासाठी पुढे ढकलण्याकरिता आम्ही हस्तक्षेप केला, कारण विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा कालावधी दिलेला नव्हता, असेही पीठाने नमूद केले. अ‍ॅड. संजय हेगडे यांनी 29 डॉक्टरांच्या वतीने ही याचिका दाखल केली होती.

 

Back to top button