कोवॅक्सिन तिसऱ्या चाचणीत ७७.८ टक्के प्रभावी | पुढारी

कोवॅक्सिन तिसऱ्या चाचणीत ७७.८ टक्के प्रभावी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा टप्पा-३ क्लिनिकल डाटा शासकीय समितीकडे सादर केला. याअगोदर याविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. तज्ज्ञ समितीकडे (एसईसी) सादर केलेल्या आकडेवारीत कोवॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे.

वाचा :‘कोरोना विषाणुंची तिसरी लाट टाळली जाऊ शकते’

फायनल चाचणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते

कोवॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी आहे. अजूनही सरकारकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. 

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने(आयसीएमआर) कोरोना प्रतिबंधासाठी कोवॅक्सिन लस तयार केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डनंतर कोवॅक्सिन ला मंजुरी दिली हाेती. यावेळी या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली नव्हती. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही लस पूर्णपणे प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच ते वापरण्याची परवानगी होती, असे सरकारने स्‍पष्‍ट केले हाेते. 

अमेरिकेत कोवॅक्सिन ला मंजुरी मिळालेली नाही

भारत बायोटेक च्या कोवॅक्सिन ला WHO ने अजुनही अंतिम मंजुरी दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतही कोवॅक्सिन लस वापरण्यास मंजुरी मिळालेली नाही. अमेरिकेच्या ड्रग रेगुलेटर फुड ॲण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने कोवॅक्सिन ला आपत्कालीन वापरास परवानगी नाकारली आहे. 

देशात सध्‍या एकूण तीन लस वापरल्या जात आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि रशियाची लस स्पुतनिक यांचा समावेश आहे.

वाचा :खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा

वाचा :‘मोदीजी धन्यवाद’चे बॅनर लावा: ‘युजीसी’

Back to top button