राहुल गांधी पंजाब प्रश्न सोडवण्यासाठी झाले ॲक्टिव्ह | पुढारी

राहुल गांधी पंजाब प्रश्न सोडवण्यासाठी झाले ॲक्टिव्ह

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाब प्रश्न सोडवण्यासाठी ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी पंजाबमधील काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. 

वाचा : मोदींपासून ते उर्मिलापर्यंत! ‘या’ राजकीय मातब्बरांनी लग्न केलं, पण मुलं जन्माला घातली नाहीत

शुक्रवारी विजेंद्र सिंगला, राणा गुरजीत सिंग, राज्यसभेचे खासदार शमशेर सिंग धिल्लोन आणि आमदार लाखवीर सिंग यांनी राहुल गांधी यांचे निवसस्थान गाठले. याचबरोबर राहुल गांधी यांनी संध्याकाली काही पंजबमधील नेत्यांचीही भेट घेतली. 

राज्यसभा सदस्य शमशेर सिंग धिल्लोन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या बैठका पंजाब काँग्रेसमधील वाद सोडवण्यासाठी घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पक्ष मजबूत करण्याचा निर्णय झाला आहे. 

बुधवारी राहुल गांधी हे पंजाबच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत भेटले. यात पंजाबचे प्रेदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनिल जखर, राज्याचे अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल आणि हरिश रावत यांचा समावेश आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आमदार नवजोत सिंग सिद्धूंनाही लवकरच समितीसमोर बोलावण्यात येणार आहे. 

वाचा : यूपीत मास्‍क न घालणार्‍या ग्राहकाला घातली गोळी!

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग देखील तीन दिवसाच्या दिल्ली भेटीवर आले होते. पण, या भेटीवेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अंतर्गत दुफळी दूर करण्यासाठी तीन सदसीय समिती नेमली आहे. 

काँग्रेसच्या दृष्टीने पंजाब हे अत्यंत महत्वाचे राज्य आहे. काँग्रेस सत्तेत असलेल्या काही राज्यांपैकी ते एक राज्य आहे. पंजाबमधील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम हा राज्याबाहेरील राजकारणावरही होणार आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 

Back to top button