आरोग्य कर्मचार्‍यांच्या विमा योजनेची मुदत सहा महिन्यांसाठी वाढवली | पुढारी

आरोग्य कर्मचार्‍यांच्या विमा योजनेची मुदत सहा महिन्यांसाठी वाढवली

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाविरोधी मोहिमेत सामील असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या विमा योजना मुदत 180 दिवसांसाठी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही, त्यामुळे या योजनेला मंगळवारपासून 180 दिवसांसाठी मुदतवाढ दिली जात असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भातील पत्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, उपसचिव आणि संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतर सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली होती.

त्याअंतर्गत 30 मार्च 2020 रोजी कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी विमा योजना राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

सुमारे 22.12 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा कवच देण्याची तरतूद या योजनेत आहे. कोरोनाविरोधी मोहिमेत सहभाग असलेल्या 1905 आरोग्य कर्मचार्‍यांचे विम्याचे दावे निकाली मागील दोन वर्षात निकाली काढण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

Back to top button