Samantha and Naga : नागा चैतन्यने घेतला मोठा निर्णय, लवकरच विवाहबंधनात अडकणार? | पुढारी

Samantha and Naga : नागा चैतन्यने घेतला मोठा निर्णय, लवकरच विवाहबंधनात अडकणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Samantha and Naga : साउथ इंडस्ट्रीतील पॉवर अॅक्टर नागा चैतन्य पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी, नागाने आपल्या चाहत्यांना जोराचा झटका दिला. त्याच्या निर्णयाने लाखो चाहत्यांचे मन हेलावले. वास्तविक, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नागा चैतन्यने सुपरस्टार समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतला. विभक्त झाल्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. पण आता नागा चैतन्यशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे जी जाणून तुम्ही थक्क व्हाल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य समंथाला (Samantha and Naga) विसरून गेला आहे. अशातच तो पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यावेळी तो कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करू इच्छित नसला तरी, यावेळी त्याला प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या मुलीसोबत लग्नगाठ बांधायची आहे. मात्र, याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.(Samantha and Naga)

नागा चैतन्य आणि समंथा यांनी गेल्या वर्षी घटस्फोट घेत सर्व चाहत्यांना धक्का दिला. अशातच आता समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा खूपच एकाकी पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो पुन्हा लग्न करण्याचा विचार करतोय, असे समजते. अक्किनेनी कुटुंबाने नागासाठी चांगली मुलगी शोधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अशी अफवा पसरली होती की नागा एका लोकप्रिय तरुण अभिनेत्रीशी लग्न करणार आहे, परंतु आता तो कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे वडील आणि अभिनेता नागार्जुन अक्किनेनी सुनेच्या शोधात आहेत, परंतु कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Samantha and Naga)

एका अहावानुसार , वेब सीरिज ‘फॅमिली मॅन 2’मध्ये सामंथाने साकारलेल्या बोल्ड कॅरेक्टरमुळे नागा चैतन्यला खूप अस्वस्थ होता. या वेब सीरिजमधील सामंथाचा बोल्ड अवतार त्याला आवडला नाही. यामुळेच दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ही दरी इतकी वाढली की नागा चैतन्य आणि समंथा वेगळे झाले, असे बोलले जाते. (Samantha and Naga)

मिळालेल्या माहितीनुसार, समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य पूर्णपणे बिघडला होता. म्हणूनच त्याच्या आयुष्यात कोणीतरी यावं आणि आपली काळजी घ्यावी असं त्याला वाटतंय. याआधीही या अभिनेत्याचे नाव अनेक सौंदर्यवतींसोबत जोडले गेले आहे, ज्यामध्ये श्रुती हासनचे नाव आघाडीवर आहे. नागाने तिला अनेक वर्षे डेट केले होते आणि त्यालाही तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, श्रुती आणि त्याचा ब्रेकअप झाआ. त्यानंतर सामंथा रुथ प्रभूने नागाच्या आयुष्यात प्रवेश केला, दोघांनीही एकमेकांना दीर्घकाळ डेट केले आणि त्यानंतर लग्नगाठ बांधली. मात्र 4 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत सर्व चाहत्यांना दे धक्का दिला. (Samantha and Naga)

नागा चैतन्यने समंथापूर्वी हिंदी आणि दक्षिणेतील अभिनेत्री श्रुती हसनलाही डेट केले आहे. दोघेही एकमेकांसाठी खूप गंभीर होते आणि त्यांना लग्नगाठ बांधायची होती. पण ते होऊ शकले नाही. नागा चैतन्यच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. करीना कपूर आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Samantha and Naga)

Back to top button