सरन्यायाधीशांकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची खरडपट्टी ! | पुढारी

सरन्यायाधीशांकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची खरडपट्टी !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये पोहचते. त्‍यावर सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली आहे. लोहखनिज निर्यात बंदी उठवण्यासंबंधी याचीका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी केंद्राची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) के.एम.नटराजन यांची कान उघाडणी केली.

प्रसारमाध्यमांमध्ये प्रतिज्ञापत्र पोहचण्यापूर्वी ते न्यायालयात दाखल करावेत, असे निर्देश देखील सरन्यायाधीशांनी यावेळी यांना दिले आहेत. न्यायालयासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर होण्यापूर्वीच सकाळी जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांमध्ये प्रतिज्ञापत्रासंबंधीचा रिपोर्ट दाखवले जातात, असे सरन्यायाधीश म्‍हणाले.

तसेच,आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र मिळाले पंरतु, सकाळीच जनसंपर्क अधिकाऱ्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखवले होते. तसेच केंद्र सरकारच्या बाजूने हे होणार नाही, असे आश्वासन यावेळी दिली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेले खंडपीठ लोहखनिज निर्यातीबंदी उठवण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेत मुबलक प्रमाणात लोहखनिज उपलब्ध आहे का? लोहखनिज निर्यातीची परवानगी देण्यात यावी का? यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने इस्पात मंत्रालयाला दिले होते.

हेही वाचा  

Back to top button