प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने मारली बाजी | पुढारी

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने मारली बाजी

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्‍तसेवा : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये समावेश करण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. याशिवाय पॉप्युलर चॉईस प्रकारात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचा चित्ररथ ‘एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम’ या थीमवर आधारित होती. ‘पारंपारिक हस्तकलेचा पाळणा’ वर आधारित चित्ररथासाठी कर्नाटकला दुसरा क्रमांक मिळाला. तिसरे स्थान मेघालयच्या 50 वर्षांच्या राज्याचा दर्जा आणि महिला सहकारी संस्था आणि ‘सेल्फ हेल्प ग्रुप्सचा आदर’ या विषयावरील चित्ररथाला देण्यात आला.

जैवविविधता आणि आणि जैव-प्रतीक ही महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्‍पना…

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम म्हणून घोषित करण्यात आले. ‘महाराष्ट्राची जैवविविधता आणि जैव-चिन्ह’ या थीमवर महाराष्ट्राचा चित्ररथ आधारित होता. तर उत्तर प्रदेशला दुसरे स्थान मिळाले. ‘जम्मू आणि काश्मीरचे बदलते रूप’ या संकल्‍पनेवर आधारीत जम्मू आणि काश्मीरचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दळणवळण मंत्रालय आणि पोस्ट विभागाचा चित्ररथ केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून घोषित करण्यात आला. या चित्ररथाची संकल्‍पना ’75 वर्षे – महिला सक्षमीकरण’ असा होता.

याशिवाय लष्करी तुकड्यांमध्ये भारतीय नौदलाला प्रथम स्थान देण्यात आले. नौदलाला सर्वोत्कृष्ट संचलन पथक म्हणून गौरवण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या तुकडीला पॉप्युलर चॉईस श्रेणीत पहिला क्रमांक मिळाला आहे. त्याच वेळी, निमलष्करी दलांच्या मार्चिंग स्क्वॉड्समध्ये CISF ला सर्वोत्कृष्ट मानण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button