कोरोना काळात : देशभरात ४० लाख अतिरिक्त मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: देशात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना मृत्यू झालेल्यांची अधिकृत संख्या ४, लाख १४ हजार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कोरोना काळात देशात ४० लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
अधिक वाचा:
- कोरोना : देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचा दावा
- कोल्हापूर : पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर, रेड आणि ऑरेंज अॅलर्ट
या सर्वांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही मात्र, करोनाने मृत्यू झालेल्यांच्या सरकारी आकड्यांपेक्षा अनेक पटींनी बळी गेल्याचे संकेत या अहवालातून मिळाले आहेत.
अमेरिकेतील ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीपासून तीन माहितीस्रोतांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अधिक वाचा:
- स्टाॅफनबर्ग : ‘या’ कमांडरने हिटलरच्या हत्येचं केलं होतं धाडस!
- राजन गवस यांच्या मुलांच्या नावे बनावट अकाऊंट; अनेक मुलींना फसविले
आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील अतिरिक्त मृत्यू नोंदणीचे विश्लेषण करून त्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रम्हण्यम या अहवालाचे सहलेखक आहेत.
अधिक वाचा:
- कोल्हापूर : खासगी लसीकरण केंद्रांवर कोरोना लसीचा बाजार
- राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबरमध्ये; शिक्षण विभागाची घोषणा
आंतरराष्ट्रीय पातळीवरील वयानुसार मृत्यूदर आणि भारतातील दोन सेरो सर्वेक्षणांची आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. देशातील १ लाख ७७ हजार घरांतील ८ लाख ६८ हजार जणांचा सर्व्हे करण्यात आला. गेल्या चार महिन्यांतील या घरांतील सदस्यांच्या मृत्यूची नोंदही त्यात करण्यात आली आहे.
अधिक वाचा:
- स्त्री भ्रूणहत्या : पुरोगामी जिल्ह्याला कलंक
- कोरोना लसीकरण : महाराष्ट्राने गाठला ४ कोटी लसीकरणाचा टप्पा
दहापट जास्त मृत्यू
या सर्व आकडेवारीचा निष्कर्ष काढण्यात आला असून करोनाकाळात देशातील अतिरिक्त मृत्यूसंख्या ३४ लाख ते ४७ लाखांवर गेल्याचा निष्कर्ष काढला आहे. ही संख्या देशाच्या करोनाबळींच्या अधिकृत आकड्याच्या दहापट आहे.
मात्र, या सर्वांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच, करोनामुळे नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणेही अवघड असल्याचे अरविंद सुब्रमण्यन म्हणाले.
अमेरिकेतील ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला असून, सुब्रम्हण्यम अहवालाचे सहलेखक आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद यांचेही या अहवालात योगदान आहे.
हेही वाचलेत का:
- अजोय मेहता यांचा फ्लॅट वादात; बेनामी व्यवहारप्रकरणी इन्कम टॅक्सची चौकशी
- ओबीसी आरक्षण : पवार, ठाकरे, थोरात हे झारीतील शुक्राचार्य
- राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबरमध्ये; शिक्षण विभागाची घोषणा
- ड्रोन हल्ला : दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
पहा व्हिडिओ: मी माझा भाऊ गमावला, ही जबाबदारी कुणाची?