कोल्हापूर : पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर, १५ बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर, १५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली होती. भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्यात बुधवारी (दि. २१) व गुरुवार (दि. २२) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट दिलेला आहे.

काल मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्यात बुधवार(दि. २१) व गुरुवार (दि. २२) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट दिलेला आहे.

अधिक वाचा : 

जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या कालावधीमध्ये अतिपाऊसमान (प्रतिदिन ७० ते १५० मिमी) किंवा त्याहून जास्त होण्याची शक्यता आहे.

सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि दिवसभर भूरभूर पाऊस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.

अधिक वाचा : 

त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या.

रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 131.44 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा : 

धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा- राधानगरी 4.64, तुळशी 2, वारणा 25.14, दूधगंगा 12.5, कासारी 1.92, कडवी 1.37, कुंभी 1.97, पाटगाव 2.55 असा पाणीसाठा आहे.

हे ही वाचा :

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button