अजोय मेहता यांचा फ्लॅट वादात; बेनामी व्यवहारप्रकरणी इन्कम टॅक्सची चौकशी

फाईल फोटो
फाईल फोटो
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन: राज्याचे निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतलेला सव्वापाच कोटींचा फ्लॅट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर आला आहे. अजोय मेहता यांनी बेनामी कंपनीद्वारे हा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा:

मेहता मुबंई महापालिकेचे माजी आयुक्त, त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव आणि सध्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.  त्यांनी मंत्रालयासमोर जगन्नाथ भोसले मार्गावर समता हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट विकत घेतला आहे.

पाचव्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट ५. ३ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. मेहता फेब्रुवारीपासून महारेराचे संचालकही आहेत.

एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण मुंबईत एका संपत्तीच्या व्यवहारात बोगस कंपनीची स्थापन करण्यात आली असून त्याकरवी बेनामी व्यवहार करण्यात आला आहे.

हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी बोगस कंपनी आणि सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यात व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. मेहता यांनी मंत्रालयाजवळील समता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट विकत घेतला आहे.

१,०७६ चौरस मीटर कार्पेट एरिया असलेल्या या फ्लॅटची किंमत ५. ३ कोटी आहे.

अधिक वाचा

भागधारक राहतात मुंबईतील चाळीत

ज्या कंपनीकडून फ्लॅट खरेदी करण्यात आला, त्या कंपनीचे दोन भागधारक मुंबईतील चाळीत राहतात. ही कंपनी फ्लॅट खरेदी व्यवहारासाठीच निर्माण करण्यात आली होती. अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.

इन्कम टॅक्सच्या बेनामी व्यवहार विभागाला बॅलन्सशीटमध्ये अनेक विसंगती आढळल्या.

कंपनीच्या भागधारकांनी टॅक्स भरला नसल्याचे समोर आले आहे. २००९ मध्ये हा फ्लॅट ४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर मेहता यांनी तोच फ्लॅट तब्बल ५.३ कोटी रुपयांना विकत घेतला होता.

अधिक वाचा 

कामेश नथुनी सिंह आणि दीपेश रवींद्र सिंह भागधारक असलेल्या या कंपनीचे ९९ टक्के भाग कामेश यांच्याकडे आहेत. त्यांचा पत्ता वेस्टर्न एक्स्प्रेस वे वरील श्याम नारायण यादव चाळीत आहे.

दुसरे भागधारक दीपेश रवींद्र सिंह यांनी केवळ २०२०-२१ या वर्षातच आयकर रिटर्न्स भरला आहे. त्यात त्यांचं उत्पन्न १ लाख ७१ हजार इतके आहे. त्यामुळे त्यांच्याकडे इतक्या रकमेची मालमत्ता खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आले याची चौकशी आता सुरू झाली आहे.

हेही वाचलेत का

[visual_portfolio id="10374"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news