नाशिक : ‘कोल्ड्रिंक्स’मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार | पुढारी

नाशिक : 'कोल्ड्रिंक्स'मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार

पंचवटी पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनाच्या बहाण्याने एका महिलेला घेऊन जात संशयिताने त्र्यंबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये पीडितेला कोल्ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

संशयित रोहित आनंद म्हसदे (25, रा. फुलेनगर, पंचवटी) याने एकाच ठिकाणी काम करणाऱ्या महिलेला रविवारी (दि.१८) दुपारी १ च्या सुमारास देवदर्शनाच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये नेले.

याठिकाणी संशयिताने पीडीत महिलेला कोल्ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये गुंगीचे औषध देवून बळजबरीने संभोग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील या तपास करीत आहेत.

Back to top button