बिग बॉस मराठी-३ : आग लावायला येतेय मराठमोळी मीनल

बिग बॉस मराठी-३ : आग लावायला येतेय मराठमोळी मीनल
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणाऱ्या बिग बॉस मराठी सीजन-३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोतील स्पर्धकांवरून आता पडदा उठला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर नशीब आजमावणाऱ्या अनेक बिलंदर कलाकारांचा या सीजनमध्ये समावेश आहे. यात मुंबईची मराठमोळी मुलगी मीनल शहा हिचा देखील समावेश आहे. मीनल ही एमटीव्ही रोडीज स्टार आहे.

'शाह' आणि मराठमोळी कशी? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल. तर तिचे शालेय शिक्षण हे वांद्रे पूर्व येथील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमात झाले आहे. शिवाय, तिची आई मराठी असल्यामुळे, लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृती आणि भाषेचं प्रभुत्व आहे.

मी लहान असताना माझे आई-वडील वेगळे झाले होते. तेव्हापासून मी आणि माझा भाऊ आईसोबत राहत आहे. वडील गुजराती आहेत.

आई मराठी असल्यामुळे तिने आमच्यावर लहानपणापासून महाराष्ट्रीयन संस्कार केलेत. त्यामुळे मुंबईतील एका सामान्य मराठी कुटुंबीयांमध्ये माझा जन्म झाला. असे ती सांगते.

meenal shah
meenal shah

एमटीव्ही रोडीज स्टार आहे शहा 

ती एमटीव्ही रोडीज स्टार आहे. तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. त्यामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरात मीनल काय कमाल करते, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे!

महेश मांजरेकरांचे सूत्रसंचालन

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीजन ३ सुरू झाला आहे. बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत.

मराठी इंडस्ट्रीतील १५ हून अधिक सेलेब्रिटीज १०० दिवसांहून अधिक दिवस शो च्या घरात राहतील.

सर्जरीनंतर मांजरेकरांचे पुन्हा दमदार आगमन

महेश मांजरेकर याची सर्जरी झाली होती. त्यांना कॅन्सर होता. या सर्जरीनंतर त्यांनी बिग बॉस मराठीसाठी प्रोमो शूट केला होता.
याविषयी बोलताना ते म्हणाले-मागील दीड वर्ष आमच्यासाठी खूप कठीण काळ होता.

परंतु, महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय शो, बिग बॉस मराठी आल्यानंतर अपेक्षा आहे की प्रेक्षक त्यांचा त्रास आणि दु:ख विसरतील. मला बिग बॉससोबत पुन्हा आल्याने आणि सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करम्यात आनंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news