मुंबई : वर्सोव्यात ५ जण बुडाले; दोघांना वाचवण्यात यश - पुढारी

मुंबई : वर्सोव्यात ५ जण बुडाले; दोघांना वाचवण्यात यश

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनादरम्‍यान मुंबईतील वर्सोव्यात ५ जण बुडाले. यावेळी दोन मुलांना स्‍थानिकांनी वाचवले. मात्र, यातील ३ मुले अद्याप बेपत्‍ता आहेत. काल (रविवार) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वर्सोव्यात ५ जण बुडाले होते.

वाचवण्यात आलेल्‍या मुलांना कूपर रूग्‍णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बुडालेल्‍या मुलांसाठी समुद्रात शोधमाहीम राबवली जात आहे.

 

Back to top button