पुणे : विसर्जनावेळी २ जण इंद्रायणी नदीत बुडाले - पुढारी

पुणे : विसर्जनावेळी २ जण इंद्रायणी नदीत बुडाले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जनावेळी २ जण इंद्रायणी नदीत बुडले. ही घटना (रविवार) अनंत चतुर्देशी दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हवालदार वस्ती, आळंदीरोड येथे घडली. दत्ता आबासाहेब ठोंबरे (वय २०), प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) असे पाण्यात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील प्रज्वलचा मृतदेह मिळून आला आहे. २ जण इंद्रायणी नदीत बुडाले हे समजताच परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षण मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीरोड येथील हवालदार वस्तीतील नागरिक इंद्रायणी नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. दरम्यान, येथील ठोंबरे कुटुंबीय घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी एकत्र आले होते. त्यावेळी दत्ता आणि प्रज्वल गणेशमूर्ती घेऊन पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले.

घटनेची माहीती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्रज्वलचा मृतदेह मिळून आला. तर, रात्री उशिरापर्यंत दत्ताचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा; माझी तब्येत उत्तम

Back to top button