Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये मलायकाने फ्लॉन्ट केली हॉट फिगर

malaika arora backless photo goes viral
malaika arora backless photo goes viral
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या ४८ व्या वर्षीही बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) सौंदर्याचे हजारो लोक वेडे आहेत. आजही तिच्या सोशल मीडियावर केलेल्या प्रत्येक पोस्टला भरपूर कमेंट्स मिळतात. अभिनेत्री मलायकाने आज पुन्हा सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. (Malaika Arora)

मलायका अरोराने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून पुन्हा एकदा तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांना दाखवली आहे. ही अभिनेत्री नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलने सर्वांची मने जिंकत असली तरी यावेळी तिची स्टाईल घायाळ करणारी आहे.

या फोटोंमध्ये मलायका बॅकलेस ड्रेस घातलेली दिसत आहे. तिचे फोटो पाहिल्यानंतर मलायकाला बॅकलेस ड्रेसमध्ये तिची फिगर कशी दाखवायची हे माहित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मलायकाने या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

मलायका तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी देखील खूप लोकप्रिय आहे. त्याची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. मलायका ४८ वर्षांची झाली असेल, पण या वयातही ती स्वत:ला इतकी फिट ठेवते की चाहते तिच्या फिटनेसचे कौतुक करतात. फिटनेससोबतच तिने ड्रेसिंग आणि फॅशनच्या बाबतीतही अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मलाईका अरोरा आपल्या चाहत्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे. मलाईकाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. ती आपल्या फिटनेसवरूनही नेहमीच चर्चेत असते. ज्यावेळी मलाईका बाहेर पडते, त्यावेळी तिच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. यावेळी अनेक चाहते मलाईकासोबत फोटो घेत असतात. मलाईकाही अशावेळी चाहत्यांना नाराज करत नाही.

पण काही दिवसांपूर्वी अनेक फोटो काढणार्‍या चाहत्यावर चांगलीच भडकली. यासंबंधीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या 'इन्स्टेंट बॉलीवूड' नामक पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मलाईका आपल्या कारमध्ये बसली असून तिच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडला आहे. यातील एक चाहता मलाईकासोबत फोटो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो अनेकवेळा फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. वारंवार फोटो काढत असल्याचे पाहून मलाईका त्याला किती फोटो काढणार आहेस? म्हणून फटकारते. यावरून मलाईका सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news