करणला जाणवतेय लाईफ पार्टनरची उणीव : करण जोहर | पुढारी

करणला जाणवतेय लाईफ पार्टनरची उणीव : करण जोहर

मुंबई : फिल्म प्रोड्यूसर करण जोहरजवळ पैसा, प्रसिद्धी असे सर्व काही असले तरी त्याला सध्या लाईफ पार्टनरची उणीव जाणवत आहे. योग्यवेळी आपल्या खासगी जीवनाकडेही लक्ष द्यावयास हवे होते, असे त्याला आता वाटत आहे. ‘फिल्म कम्पेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत करणने सांगितले की, प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफकडे लक्ष दिले असते तर बरे झाले असते. याची खंत आता मला सतावत आहे. मला भविष्यात लाईफ पार्टनरची गरज भासेल, असे कधीच वाटले नव्हते. रिलेशन बिल्डिंग, प्रोड्यूसर बिल्डिंग आणि स्टुडिओ बिल्डिंगमध्ये मी माझे खासगी जीवनच विसरून गेलो; पण आता यास फारच उशीर झाला आहे, असे मला आता वाटत आहे.

Back to top button