कार्तिकसोबत जेनिफर करणार स्क्रीन शेअर | पुढारी

कार्तिकसोबत जेनिफर करणार स्क्रीन शेअर

मुंबई : अनेक टीव्ही शोमध्ये जेनिफर विंगेटला अभिनय करताना पाहिले आहे. तिने टीव्ही शोजमध्ये आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर ‘माया’ आणि ‘कुमूद’सारखी पात्रे साकारली आहेत. यामुळे तिचा एक चाहत्यांचा मोठा वर्ग तयार झाला आहे. अशी ही अभिनेत्री जेनिफर आता बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यात सज्ज झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्म मेकर्सनी जेनिफरशी संपर्क केला आहे. सर्वकाही सुरळीत पार पडले तर ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र, जेनिफर अथवा कार्तिककडून याबाबत कसलीच अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, जेनिफरचा समावेश जास्त मानधन घेणार्‍या टीव्ही अभिनेत्रींमध्ये होतो. तिने ‘कसौटी जिंदगी मे’ या मालिकेत स्नेहा बजाजची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका फारच गाजली होती.

Back to top button