निक म्हणतो, प्रियांका मजबूत ‘आई’ | पुढारी

निक म्हणतो, प्रियांका मजबूत ‘आई’

नवी दिल्ली : हॉलीवूड आणि बॉलीवूडचे एक सुंदर दाम्पत्य म्हणजे निक जोनास आणि प्रियांका चोप्रा होय. हे दोघेही सध्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. या दाम्पत्याने यावर्षी जानेवारीत सरोगेसीच्या माध्यमातून आपल्या पहिल्या अपत्याच्या रूपात मुलगी मालती मॅरी चोपडा जोनासचे स्वागत केले. अनेक दिवसानंतर या कपलने मुलीच्या जन्माची माहिती सोशल मीडियावर दिली. या पोस्टमध्ये कपलने सांगितले होते की, एनआईसीयूमध्ये तब्बल 100 दिवस राहिल्यानंतर आपली सुंदर मुलगी घरी आली आहे. निक जोनासने एका मुलाखतीत पत्नीचे कौतुक करताना सांगितले की, खरोखरच प्रियांका एक मजबूत आई आणि परफेक्ट पार्टनर आहे. काहीही झाली तरी ती आपल्यासोबत एखाद्या पर्वतासारखी उभी राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाने प्रियांकाचा पहिला मदर्स डे साजरा केला, असेही निकने सांगितले.

Back to top button