Dr. Babanrao Taiwade: मनोज जरांगेंनी पुनर्विचार करून समाजाला शांत करावे : डॉ. बबनराव तायवाडे | पुढारी

Dr. Babanrao Taiwade: मनोज जरांगेंनी पुनर्विचार करून समाजाला शांत करावे : डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलकांनी आता थांबले पाहिजे, आंदोलन कर्त्यांनी विचार करावा, न्याय पालिकेतील मोठे तज्ज्ञ सांगत आहे, की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगे-पाटील यांच्यासारखे समाजाला लाभणारे योद्धा कमी आहेत, त्यांनी मागणी बदलावी आम्ही सोबत राहू, त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आज जरांगे यांनी केलेली मागणी तळागाळात पोहोचली, ती मागणी कायदेशीर आहे की नाही, हे मराठा समजातील जनतेला माहीत नाही. (Dr. Babanrao Taiwade)

त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी याचा विचार करावा, तसेच जरांगे पाटील मागणी बदलत नाही तोपर्यंत यातून मार्ग निघणार नाही. मुख्यमंत्री यांनी जरांगेंना विनंती केली. आम्ही ही विनंती करतो, जरांगे पाटलांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा आणि समाजाला शांत करावे, असे प्रतिपादन ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. (Dr. Babanrao Taiwade)

जरांगे यांची भूमिका आल्यानंतर तायवाडे माध्यमांशी बोलत होते. सरकारने आज पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली, नियमाला अधीन राहून 11 हजार 300 नोंदी मिळाल्यात, उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे सांगितले आहे. सरकार महसूल अधिकाऱ्यांना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देणार आहे.

ओबीसीत इतर जातीच्या लोकांना कागदपत्र मिळत नाही, त्यांच्यासाठी कागदपत्रे तपासून ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, या निर्णयाचे स्वागत करतो. सरकार आरक्षण देण्याचे प्रयत्न करण्यासाठी कटीबध्द आहे, यात मराठा समाज मागासलेला आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावे. मात्र, सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी उग्र आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही, आज सामान्य माणूस सोबत आहे, पण अशा पद्धतीने नुकसान होणार असेल, तर सामान्य माणूस आंदोलन कर्त्याचा विरोध करायला सुरुवात करेल.

ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याने सरकारची बाजू स्पष्ट झाली, ओबीसी आंदोलन कर्त्यांनी संविधानाला धरून मागणी केली होती. या आंदोलनामागे जर कुणाचा राजकीय हेतू असेल, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button