अमरावती : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अमरावती लोकसभा निवडणूक लढणार : आनंदराज आंबेडकर | पुढारी

अमरावती : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अमरावती लोकसभा निवडणूक लढणार : आनंदराज आंबेडकर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अमरावती लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती आज रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली. “आमच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्त्यांची देखील तशी इच्छा आहे. त्यामुळे येथे लढण्याबाबत चाचपणी सुरु आहे, असे आंबेडकर यांनी सर्किट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

इंडिया आघाडीसोबत आमची बोलणी सूरु असून आम्ही त्यांना लोकसभेसाठी अमरावतीच्या एका जागेची मागणी केल्याचे देखील त्यांनी सांगितले. अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकार्‍यांनी या संदर्भात शरद पवार यांची भेट घेतली आहे. मी देखील त्यांची भेट घेणार आहे. अमरावतीचा विकास जसा व्हायला हवा होता तसा झाला नाही. अमरावती हे नागपूर नंतर विदर्भातील दुसरे मोठे शहर आहे. देशासह जगभरात संत्रानगरी म्हणून परिचित आहे, असेही ते म्हणाले.

अमरावती लोकसभा कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढणार या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या बी फॉर्मवर ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी विनायक दुधे, प्रा.सतीश सियाले, पी.एस. खडसे, बाळासाहेब वाकोडे आदि उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button