गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील महिला ठार | पुढारी

गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील महिला ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गावाजवळच्या जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिेलेला वाघाने हल्ला करुन ठार केले. गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे आज (दि.१५) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. माया धर्माजी सातपुते (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.

माया सातपुते आज जगलात सरपण गोळा करण्याकरिता गेल्या होत्या. मात्र, अचानक झुडुपातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या जागीच गतप्राण झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. सातपुते परिवाराला वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button