शरद पवार यांचा दाखला आम्ही व्हायरल केला नाही; चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

शरद पवार यांचा दाखला आम्ही व्हायरल केला नाही; चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार दिवसानंतरही तिथे जाता आले असते. दिवाळीच्या दिवसातही राजकारण करणे योग्य नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा दाखला व्हायरल आम्ही कशाला करणार? आम्हाला तर लोकांजवळ जाऊन पालावर दिवाळी साजरी करायची आहे. शरद पवारांचा दाखला कोणी व्हायरल केला? आम्हाला माहित नाही,  असा पलटवार  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

भारतीय जनता पार्टीने पालावरती दिवाळी, ज्यांच्याकडे अंधार आहे, त्यांना उजेडात आणावे, या संस्कारावर महाराष्ट्रातील सगळे आमदार, खासदार यांच्यासह १ हजार कार्यकर्ते पालावरती जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. मी स्वतः ससेगाव येथील गोपाळ वस्तीवर गेलो. पालावरती राहणाऱ्या लोकांना घर मिळाले पाहिजे. शिक्षण मिळाले पाहिजे, गरीब कल्याणाच्या योजना मिळाल्या पाहिजे, यासाठी योजना तयार केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घर सुद्धा या लोकांना देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील पाच लाख लोकांच्या घरी पालावरती दिवाळी साजरी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज पालावरती दिवाळी साजरी करत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button