नागपूर: ग्रा.पं. निवडणुकीत विजय झालेल्या भाजप नेत्याचा खून | पुढारी

नागपूर: ग्रा.पं. निवडणुकीत विजय झालेल्या भाजप नेत्याचा खून

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व भाजपचे नागपूर ग्रामीणचे नेते राजू डेंगरे यांची त्यांच्याच ढाब्यावर आज (दि.११) पहाटे साडेतीनच्या सुमारास हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामागे राजकीय वैमनस्य आहे की आणखी काही, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. विहिरगाव परिसरात राजू डेंगरे यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीननंतर ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. राजू डेंगरे हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  निवडून आले होते. या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button