Murder of medical student : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून | पुढारी

Murder of medical student : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजता दरम्यान वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Murder of medical student ) परिसरात ही धक्‍कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक पाल असे मृत भावी डॉक्टरचे नाव आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात (Yavatmal) डॉ. अशोक पाल हा एमबीबीएसमध्ये तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी महाविद्यालय परिसरातून डॉ. पाल जात असताना अनोळखी मारेकऱ्यांनी वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.  परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी त्‍याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. पाल याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस कर्मचारी अन्सार बेग, बबलू चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात अद्यापही विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

हेही वाचलं का?

 

पहा व्हिडीओ : हजारो दिव्यांनी उजळला किल्ले पन्हाळा

हे वाचलंत का? 

Back to top button