Maa Annapurna : 'माॅं अन्नपुर्णाची' मूर्ती काशी विश्वनाथ मंदिरात स्थापित होणार | पुढारी

Maa Annapurna : 'माॅं अन्नपुर्णाची' मूर्ती काशी विश्वनाथ मंदिरात स्थापित होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : १०० वर्षांपूर्वी वाराणसीतील १८ व्या शतकातील ‘माॅं अन्नपुर्णा’ची (Maa Annapurna) मूर्ती कॅनडाने भारताला परत केलेली आहे. आता भारत सरकार ही मूर्ती उत्तर प्रदेश सरकारला सोपविणार आहे. ज्यांनंतर माॅं अन्नापूर्णा या मूर्तीची काशी विश्वनाथ मंदिर परिसरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

१८ व्या शतकातील माॅं अन्नपुर्णाची (Maa Annapurna) मूर्ती १०० वर्षांपूर्वी चोरी झालेली होती आणि या मुर्तीला कॅनडामध्ये नेण्यात आले होते. असं सांगितलं जातं की, ही मूर्तीचं स्वरुप हे वाराणसीचे आहे आणि तेव्हा ती मॅकेंजी आर्ट गॅलरीच्या रेजिना विश्वविद्यालयाच्या संग्रहालयाचा हिस्सा होती.

जेव्हा या गॅलरीचे आगामी प्रदर्शनाची तयारी सुरू झालेली होती. तेव्हा एक कलाकार दिव्या मेहरा मॅकेंजीच्या कलेक्शनमधून जात असताना या मुर्तीवर दिव्या यांची नजर गेली. त्यानंतर त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि सांगितले की, ही मूर्ती बेकायदेशीर मार्गाने कॅनडा येथे आणण्यात आली आहे. त्यानंतर ही मूर्ती भारताला सुपूर्द करण्यात आली.

रेजिना विद्यापीठाचे कुलगुरू थाॅमस चेन यांनी ही मूर्ती भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी सोपविण्यात आली. आता भारत सरकार ही मुर्ती उत्तर प्रदेशकडे सोपविणार आहे. ज्यानंतर मा अन्नपुर्णाची मूर्ती १५ नोव्हेंबर रोजी काशी विश्वनाथ मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे.

माॅं अन्नपुर्णा मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर हजारो-लाखो भक्त विश्वनाथाच्या दर्शनानंतर मा अन्नपुर्णाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. आज दिल्लीमध्ये केंद्र सरकार एका कार्यक्रमात ही मूर्ती उत्तर प्रदेश सरकारला सोपविण्यात येणार आहे.

पहा व्हिडीओ : शिवप्रताप दिन विशेष : अफझलखानाचा कोथळा काढलेली वाघनखं सध्या कुठयंत?

Back to top button