चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात ३ वर्षीय वाघाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात ३ वर्षीय वाघाचा मृत्यू

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा वायगाव इथल्या शेतात एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी (11 नोव्हेंबर) रोजी उघडकीस आली. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात चंदनखेडा-वायगाव रोडवरील गजेंद्रसिंग रणदिवे या शेतकऱ्याच्या शेतात आज एका वाघाचा मृतदेह आढळला.

या मृत झालेल्या वाघाचे वय अंदाजे 3 वर्षांचे असल्याचे बोलले जात आहे. या वाघाचा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र असेही बोलले जात आहे की, या वाघाचा मृत्यू इतर ठिकाणी झाला असावा आणि त्यानंतर त्याचा मृतदेह या ठिकाणी टाकला असावा अशीही शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

Back to top button