Gold Silver Price : लग्नसराई आधीच सोने तेजीत, ५० हजारांकडे वाटचाल! | पुढारी

Gold Silver Price : लग्नसराई आधीच सोने तेजीत, ५० हजारांकडे वाटचाल!

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Silver Price Today : यंदाचा ‘लग्नसराई’चा ‘हंगाम’ सुरू होण्याआधीच सोन्याचे दर वाढू लागले आहेत. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार रुपयांच्या पार पोहोचलाय. सराफा बाजारात आज गुरुवारी (दि.११) २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६९ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४९,१४० रुपये होता. तर २२ कॅरेट सोने ७०४ रुपयांनी महाले आहे. सोने महागले असले तरी चांदी प्रति किलो मागे १,७९२ रुपयांनी स्वस्त झाली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Silver Price Today गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४९,१४० रुपये, २३ कॅरेट सोने ४८,९४३ रुपये, २२ कॅरेट सोने ४५,०१२ रुपये, १८ कॅरेट ३६,८५५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २८,७४७ रुपये होता. चांदीचा प्रति किलो दर ६६,३४८ रुपये होता. (हे गुरुवार दि. ११ नोव्हेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो).

आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोने भाव ४९,१४० रुपयांनी सुरु झाला. काल बुधवारी सोन्याचा भाव ४८,३७१ रुपये होता. आज या दरात ७६९ रुपयांची तेजी आली. पुढील काही दिवसांत सोने ५० हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …आणि या गावाच नाव अपशिंगे मिलिटरी पडलं

Back to top button