कंगना राणावत : 'देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, १९४७ मध्ये मिळालेली भीक होती' | पुढारी

कंगना राणावत : 'देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, १९४७ मध्ये मिळालेली भीक होती'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

टाईम्स नाऊ समिट २०२१ मध्ये कंगना राणावत हिने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या वक्तव्यानंतर त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री स्वरा भास्करपासून ते माजी आयएएस आणि अनेक काँग्रेस नेते भाजप आणि कंगनावर भडकले आहेत. या इव्हेंटमध्ये कंगनाने म्हटले की, १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.

कंगना तिच्या वक्तव्यात म्हणाली की, ‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडेल, पण हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचे रक्त सांडू नये हेही लक्षात ठेवावं लागेल. त्यांनी अर्थातच स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, भिक होती. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये मिळाले.

यावर नाविका कुमार म्हणाल्या की, ‘म्हणूनच सगळे तू भगवा आहेस अस म्हणतात. यावर उत्तर देताना कंगना म्हणाली की, यानंतर माझ्याकडे आणखी १० केसेस येणार आहेत. नाविका म्हणाल्या की, तु आता दिल्लीत आहेस, यावर कंगना म्हणाली की, घरी तर जायचं आहे.

कोण आहेत ते मूर्ख लोक जे हे ऐकून टाळ्या वाजवू लागले

कंगनाने हे वक्तव्य केल्यानंतर कार्यक्रमात बसलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली की, ‘कोण आहेत ते मूर्ख लोक जे हे ऐकून टाळ्या वाजवू लागले. मला जाणून घ्यायचे आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, ‘आमच्या स्वातंत्र्याला भीक मागणे म्हणणे यालाच असंतुलित मानसिक दृष्ट्या विकृत म्हटले जाईल. ज्या स्वातंत्र्यासाठी लाखोंनी प्राणांची आहुती दिली. बरं, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे? नाविका जी, स्वातंत्र्यासाठी वापरण्यात आलेल्या या शब्दावर आणि विधानावर तुम्ही टीका का केली नाही? की तुमच्याकडूनही आशा करणे व्यर्थ आहे?’

माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले की, म्हणूनच म्हटले होते की, “प्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बनना, कंगना नाही.” भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची भीक म्हणणारी कंगना. वर्षाचे ७५ वे वर्ष साजरे करत आहात की, तुमच्या भक्तांच्या मते ‘भिकेत मिळालेलं स्वातंत्र्य?

हे ही वाचलं का? 

Back to top button