CNG Rate: सीएनजी दरात कपात; वाहन चालकांना दिलासा | पुढारी

CNG Rate: सीएनजी दरात कपात; वाहन चालकांना दिलासा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही महिन्यापूर्वी देशात सर्वाधिक 120 रुपये प्रति किलो असे दर असलेल्या सीएनजीच्या दरात आज ( दि. १८) घसरण झाली. उपराजधानीतील सीएनजी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज नागपुरात 89.90 रुपये प्रति किलो या दराने सीएनजी विक्री केली जात आहे. (CNG Rate)

काही दिवसांपूर्वी 99.90 अर्थात 100 च्या घरात सीएनजीचे दर पोहोचले होते. महागाई वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरात कुठलाही मोठा दिलासा दिलासा मिळत नसताना निश्चितच सीएनजीच्या दरात झालेली ही कपात नागपूरकरांसाठी गुड न्यूज म्हणता येईल. सध्या नागपुरात सीएनजी ट्रक टँकरच्या माध्यमातून येत असला तरी भविष्यात गुजरात वरून मुंबई मार्गे नागपूरात सीएनजी थेट गॅस पाईप लाईनने येणार आहे. (CNG Rate)

यावेळी तो अर्थातच अधिकच कमी किमतीत उपलब्ध होईल, असा विश्वास सीएनजी विक्रेत्यांना आहे. महागाईच्या काळात सीएनजीचे दर काही प्रमाणात का होईना कमी झाल्याने दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया सीएनजी वाहन चालक अंकुश गेडाम यांनी दिली आहे.

हेही वाचा  

Back to top button