Washim Crime: मानोरा शहरात भरदिवसा तरुणाचा खून; एकजण गंभीर | पुढारी

Washim Crime: मानोरा शहरात भरदिवसा तरुणाचा खून; एकजण गंभीर

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: मानोरा शहरात (Washim Crime)  मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (दि.२६) सकाळी साडे अकराच्या सुमारास दोन युवकांवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मानोरा शहरातील (Washim Crime)  छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवा विलास उघडे (वय २०, रा. बेलोरा (विठोली) आणि त्याचा मित्र राहुल मनोहर चव्हाण (वय 25, रा. भूली) उभे होते. त्यावेळी अज्ञात मारेकरी मोटार सायकल वरून आले आणि त्यांनी उघडे आणि चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या थरारक हल्ल्यात शिवा याचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल हा गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मारेकरी मांगकिणी (ता. दारव्हा) येथील असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी तपासाच्या सुचना दिल्या. पुढील तपास मानोरा शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button