Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये सामाजिक मोर्चा

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये सामाजिक मोर्चा

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानकडे २५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. यानंतर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये मोर्चा काढण्यात आला. ( Sameer Wankhede)

समीर वानखेडे वाशिम जिल्ह्यातील वरूड तोफा गावचे रहिवासी असून येथील गावकरी, नातेवाईक आणि त्यांच्या समर्थकांच्या वतीने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह अधिकारी समीर वानखेडे यांचे समर्थक मोर्चात सहभागी झाले होते. ( Sameer Wankhede)

यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी महागाचे कपडे घड्याळ परिधान केल्यास त्यांच्यावर सीबीआय धाड टाकू शकत नाही. समीर वानखेडे यांच्यावर द्वेषातून कारवाई आली आहे असा आरोप दीपक केदार यांनी केला आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news