सहा विधानसभा क्षेत्रात भाजपला हद्दपार करणार : खासदार प्रतिभा धानोरकर | पुढारी

सहा विधानसभा क्षेत्रात भाजपला हद्दपार करणार : खासदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गुरूवारी (दि.13) राजुरा येथे सत्कार करण्यात आला. या दरम्यान बोलताना लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभेच्या जागा निवडून आणण्याचा विडा उचलत भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. राजुरा येथे झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

सत्कार सोहळ्याला बोलताना त्या म्हणाल्या, भाजपला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः विधानसभा क्षेत्रात प्रचार करणार आहे. माझ्या लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा नाही साफ केला तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही, या शब्दात त्यांनी भाषण केले.

तिकीट हायकमांड वाटप करतात, खासदार नाहीत : प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी दिली खासदारांना समज

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या आमदाराना मंत्रीपद मिळावं, यासाठी आपण प्रयत्न करणार तसेच विधानसभा उमेदवारांच्या तिकीट मीच वाटणार आहे. असे वक्तव्य खासदार धानोरकर यांनी राजुरा येथील सत्कार सोहळ्यात केले होते. त्याचे प्रतिसाद थेट राज्यात उमटले. तिकीट हायकमांड वाटत असतात, तो अधिकार खासदाराला नाही. खासदार शिफारस करू शकतात. आपली मतं मांडू शकतात, अशा शब्दात पटोले यांनी धानोरकरांना समज दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button