विकृतीचा कळस! मदत करण्याच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर तीनवेळा अत्याचार | पुढारी

विकृतीचा कळस! मदत करण्याच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर तीनवेळा अत्याचार

अकोला; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी दाम्पत्याच्या अंधत्वाचा गैरफायदा घेत, मदत करणाऱ्या व्यक्तीनेच अंध महिलेवर तीच्या पतीसमाेरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गुलाम रसूल शेख मतीन (वय २६) या नराधमाला अटक केली.

याबाबत सविस्तर अशी की, एक अंध दाम्पत्य आपल्या पाच वर्षांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. अकोला शहरातील एका बसस्थानकामध्ये ते उतरले, दरम्यान या परिसरात पाऊस सुरू असल्याने पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकावर रात्रीचा मुक्काम करायचे ठरवले. पत्ता विचारत एका व्यक्तीची मदत घेतली. मात्र या व्यक्तीने मदत करतो असे सांगून दोघा दाम्पत्यांना अकोटफैल परिसरात नेले व दोघांच्या अंधपणाच्या संधीचा फायदा घेत महिलेवर अत्याचार केला. तब्बल तीन वेळा तिच्यावर जबरी अत्याचार संशयित आरोपीने केला.

मुलगी लहानपणापासूनच आजीकडे राहायची. दरम्यान मुलीच्या भेटीसाठी दोघेही बसने जात होते. अंध दाम्पत्यमधील महिलेने तिच्या आईला फोनवर मुलीला भेटायला येणार असल्याची माहिती दिली. तुम्हा दोघांना पोहचायला रात्र होणार, त्यामुळे उद्या सकाळी या, असे आईने सांगितले होते. तेव्हा दोघांनीही रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला आणि ही अत्याचाराची घटना घडली. अत्याचारग्रस्त महिलेने पतीसह पाेलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. त्यावरून पाेलिसांनी दोन्ही बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारावर सज्जाद हुसेन यांनी गुलाम रसूल शेख मतीन (दि. २६) अटक केली असल्याचे पाेलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

Back to top button