नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाचे पी.टी. उषा यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाचे पी.टी. उषा यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा आणि माजी खासदार पी.टी. उषा यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुलाच्या सिथेटिक ट्रॅकच्या मैदानावर झालेल्या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, पीयूष आंबुलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

२२ जानेवारी पर्यंत भरवण्यात आलेल्या या महोत्सवात शहरातील वेगवेगळ्या भागांमधील ६३ मैदान व क्रीडास्थळांवर ५५ खेळ खेळले जाणार आहेत. यंदा प्रथमच विदर्भस्तरीय स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार असून एका राज्यस्तरीय स्पर्धेचा समावेश आहे.

यावेळी गडकरी व मिताली यांच्यातील एका छोटेखानी क्रिकेट सामन्याने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. विशेष म्हणजे गडकरींनी टेनिस बॉलने केलेल्या गोलंदाजीवर एक-दोन वेळा मिताली व उमेश यादवला चकवले देखील. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, नागपुरातून भविष्यात देशाला ऑलिम्पियन खेळाडू मिळावेत. आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व नागपूरच्या खेळाडूंनी करावे. तरच या महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश सफल झाल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

खेळातही आता होऊ शकते करिअर

खासदार क्रीडा महोत्सवाबद्दल बोलताना मिताली म्हणाली, आता क्रीडा हे क्षेत्र केवळ मनोरंजन आणि फिटनेसपूरता मर्यादित राहिलेला नाही. या क्षेत्रात करिअरही करता येऊ शकते. त्यामुळे खेळात करिअर करण्याच्या दृ्ष्टीनेच आता बघण्यात येत आहे. ही एक अत्यंत चांगली बाब आहे. या प्रकारच्या महोत्सवातून खेळाडूंनीही भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व कसे करता येईल? याचे ध्येय उराशी बाळगावे, असे आवाहनही मितालीने केले.

हेही वाचंलत का?

Back to top button