वर्धा : कर्तव्य बजावताना वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनाच्या धकडकेत मृत्यू | पुढारी

वर्धा : कर्तव्य बजावताना वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनाच्या धकडकेत मृत्यू

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नागपूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खंडाळा परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी महामार्गावर ट्रकने टिप्परला धडक दिली आणि टिप्परने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. या विचित्र अपघातात कर्तव्य बजावणारे वाहतुक पोलिस कर्मचारी गौरव खरवडे यांचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. १०) सकाळी घडला.

नागपूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर महामार्ग पोलीस मदत केंद्रचे पोलीस कर्मचारी वाहन तपासणी करत होते. यावेळी महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करून मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई सुरू होती. यावेळी एका टिप्परला (वा.क्र. के.ए.३७ ए ८५७६) थांबण्यास सांगितल्याने तो टिप्पर थांबला होता. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (वा.क्र. एम.एच. ३४ ए.बि.०७२५) टिप्परला जबर धडक दिली. त्यात समोरील टिप्परने पोलिस कर्मचारी गौरव खरवडे यांना धडक देत दुभाजकावर गेला. यामध्ये पोलिस कर्मचारी गौरव खरवडे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचाराकरीता समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात ट्रकचालक सुनील ढोणे गंभीर जखमी असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला

Back to top button