चंद्रपूर : चित्‍याप्रमाणे सारस पक्षाला चंद्रपुरात परत आणण्याचा पस्‍ताव! | पुढारी

चंद्रपूर : चित्‍याप्रमाणे सारस पक्षाला चंद्रपुरात परत आणण्याचा पस्‍ताव!

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ह्यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी २०२२ ला ९ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठकात चर्चा होऊन सारस संवर्धन आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात चित्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातून नामशेष झालेला सारस पक्षी पुन्हा चंद्रपुरात आणण्याचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठविण्यात आला. वन्यजीव सप्ताहानिमित्ताने ही माहिती समितीचे सदस्य सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

गोंदियाच्या SEWA संस्थेने अभ्यास करून सारस पक्षी विदर्भातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा अभ्यास प्रकाशित केला होता. या अभ्यासाची स्व:त उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती-सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांनी दखल घेवून, 5 जानेवारी 2022 ला दिलेल्या आदेशानुसार भंडारा,गोंदिया आणि चंद्रपूर येथे लुप्त होणाऱ्या सारस क्रेन पक्षाच्या संवर्धनासाठी २ फेब्रुवारी २०२२ रोजी सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा सारस संवर्धन समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद,चंद्रपूर तर सदस्यांमध्ये ३) विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वन विभाग, कार्यकारी अभियंता- जलसंपदा विभाग, जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग, विभागीय वन व्यवस्थापक, चंद्रपूर तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सेवा संस्था गोंदिया, निमंत्रित संस्था म्हणून ग्रीन प्लॅनेट सोसायटी, इको प्रो ह्यांचा समावेश होता.

या समितीने जिल्ह्यातील पक्षांचे अस्तित्व, स्थिती ,र्‍हासाची कारणे आणि संरक्षणासाठी आराखडा तयार केला. विविध विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात एकही सारस पक्षी गेल्या २ वर्षापासून आढळला नसल्याचे लक्षात आले. संस्थेचे सदस्य प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सारस पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात आणावा असा प्रस्ताव समितीसमोर मांडला. त्यानुसार हा प्रस्ताव समितीने न्यायालयाकडे पाठवविला आहे. इथे लहान पिले आणायची,जोडी आणायची कि कृत्रिमरीत्या अंडी उबवायची याचा अभ्यास,आणि वन्यजीव बोर्डाच्या मान्यतेनंतरच सारस पक्षी पुन्हा चंद्रपुरात आणण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

या आराखड्यात वन विभाग, कृषी विभाग, जल संपदा आणि इतर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात एकही सारस पक्षी आढळला नाही, परंतु भविष्यात हा पक्षी आला तर त्याला लागणारा अधिवास सुरक्षित राहावा यासाठी समितीने उपाय योजना सुचविल्या. त्यामध्ये अधिवास सुधारणा, नवीन पाणथळ अधिवास तयार करणे, शेतकरी, विध्यार्थी आणि नागरिकांत पक्षी वाचविण्यासाठी जनजागरण करणे, त्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे, सारस पक्षाच्या अस्तित्वासाठी धोकादायक बाबी (इलेक्ट्रिक तारा, आक्रमक परकीय प्रजातीचे गवत, मासे, रासायनिक, किटकनाशके) चे निर्मुलन करणे, सारस मित्र तयार करणे अश्या अनेक उपाय योजना सुचविण्यात आल्‍या आहेत.

पृथ्वीवर आज केवळ २५,००० सारस पक्षी शिल्लक आहेत ,२०१८ च्या सर्वेनुसार देशात पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात १४९३८ पक्षी शिल्लक आहेत. ही संख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात आज केवळ ४० सारस पक्षी उरले आहेत. महाराष्ट्रात केवळ भंडारा (०४), गोंदिया (३५ पक्षी) आणि चंद्रपूर (०१) जिल्ह्यातच सारस क्रेन पक्षी आढळले आहेत. मात्र चंद्रपूर येथे २० वर्षापूर्वी जुनोना येथे ४ सारस पक्षी होते. १० वर्षापूर्वी केवळ १ पक्षी उरला होता. आता हा एकमेव सारस अनेक वर्षे राहून त्याचा मागील वर्षीपासून तो दिसेनासा झाला आहे. विदर्भात १०३ सारस पक्षी संख्या होती. ती आता घटून ४० झाली असून, ती सतत घटत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. IUCN संरक्षण स्थीती नुसार सारस क्रेन पक्षी संकटग्रस्त ( Vulnerable) श्रेणीत आणि वन्यजीव अधिनियमा नुसार शेडूयुल ४ मध्ये येतो. जगात सारस हा उडू शकणारा सर्वात मोठा पक्षी आहे आहे, परंतु उच्च दाबाच्या वीज वाहिन्या, रायासानिक खते आणि कीटक नाशके, अंडी खाणारे कुत्रे आणि मासभक्षी प्राणी, अंडी चोरने आणि बदललेली पिक पद्धती हे या पक्षाच्या नष्ट होण्यासाठी कारणीभूत घटक आहेत.

सारस क्रेन हा उडू शकणारा जगातील एकमेव पक्षी आहे. उत्तर प्रदेशाचा तो राज्य पक्षी आहे. त्याचा अधिवास तळे ,नदी, जवळील धानाची शेती आणि पाणथळ-गवताळ प्रदेशात असते. त्याची उंची ५ फूट आणि पंखांची लांबी ८ फुट, वजन ७ किलो असू शकते, हे पक्षी आयुष्यभर जोडी करून राहतात आणि वर्षातून पावसाळ्यात केवळ २ अंडी देतात. कित्येक किमीवरून पक्षांचा मोठा आवाज ऐकायलां येतो. लाल मान आणि डोके असलेल्या या पक्षांचा जीवनकाळ जवळजवळ २० वर्षांचा असतो. यांना प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून भारतात प्राचीन काळापासून मानले जाते.

हेही वाचा :  

Back to top button