Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर | पुढारी

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार चेंबूर येथील व्यापारी ललितकुमार टेकचंदानी  यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आपल्या एका वादग्रस्त विधानावरून चर्चेत आहेत. त्यानंतर आता धमकी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. छगन भुजबळ आणि अन्य दोघांच्या विरोधात धमकी दिल्याप्रकरणी चेंबूर येथील ललितकुमार टेकचंदानी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर भादंसंच्या कलम ५०६ (२) (धमकी देणे) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Chhagan Bhujbal : काय म्हटलं आहे तक्रारीत 

ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांचेच हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या भाषणाचे व्हिडिओ मोबाईलवर पाठवले होते. त्याच्या नंतर ललितकुमार यांना ‘तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं तुला महागात पडेल’, तुझा घरी येऊन गोळ्या टाकतो, मी दुबईची लोकं लावतो, असे धमकी वजा व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज आले. असं आपल्या तक्रारीत ललितकुमार टेकचंदानी यांनी म्हंटले आहे.

ललितकुमार यांना ज्या मोबाईलवरुन हे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज आले तो मोबाईल नंबर त्यांनी पोलिसांना दिला आहे. हे कॉल आणि मेसेज नेमके कोणी केले याचा तपास पोलीस करत आहेत.

काय म्हंटले होते छगन भुजबळ 

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी एक विधान केले होतं. त्यावरुन ते गेले काही दिवस चर्चेत आहेत. त्यांनी म्हंटल होतं की, शाळांमध्ये जिला आम्ही कधी पाहिलं नाही त्या सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. त्यांची पूजा कशासाठी करायची? पण शाळेत फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला आहे. या वक्त्यावरुन वाद सुरु झाला. या विधानावर छगन भुजबळ यांनी खुलासाही केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button