नागपूर : कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू | पुढारी

नागपूर : कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३ ऑगस्ट) घडली. राहुल दशरथ ठोंबरे (वय २५) व उमेश श्रावण ठाकरे (वय २६) अशी मृतकांची नावे आहे.

हे दोघेही मौद्यात एका खासगी समारंभासाठी आले होते. तो आटोपल्या नंतर दोघेही पोहण्यासाठी गेले होते. मौदा येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळ असलेल्या नदी पात्रात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही वाहून गेले. या बाबतची माहिती मिळताच तहसीलदार मलिक वीराणी, ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. स्थानिक पोहणारे व बोटीच्या साहाय्याने त्या दोघांचा मृतदेहाचा शोध सुरू केला. परंतु, सायंकाळपर्यत दोघांचेही मृतदेह हाती लागले नव्हते.

Back to top button