गडचिरोली : विहिरीत आढळला शाळकरी विद्यार्थिनीचा मृतदेह | पुढारी

गडचिरोली : विहिरीत आढळला शाळकरी विद्यार्थिनीचा मृतदेह

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येनापूर येथे एका (१४ वर्षीय) मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ माजली आहे. सुजाता जनार्दन गोंगले,रा.येनापूर असे मृत मुलीचे नाव असून, ती गावातील इंदिरा गांधी विद्यालयात शिकत होती.

२६ फेब्रुवारीला संध्याकाळी सुजाता घराबाहेर पडली. परंतु ती घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी सुजाताचा भाऊ प्रेमानंद गोंगले याने आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान आज सुजाताचा मृतदेह पुरुषोत्तम राऊत यांच्या विहिरीत आढळून आला. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. मात्र, मुलीने आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला, याबाबत चर्चेला ऊत आला आहे.

Back to top button