

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्रांच्या स्वीय सहाय्य रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. माझी बोलती बंद करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ९० लोक ट्रक भरून मला मारायला पाठवले होते. भावना गवळी यांनीदेखील माझ्या गाडीवर गुंडाच्या मार्फत हल्ला केला. पण, मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डन येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. यावरील २१ कोटींचा दंड वसूल करण्यात यावा. या मागणीसाठी त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. यामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामच्या संदर्भात २१ कोटींचा दंड आकारण्यात आला, असेही सोमय्या यांनी सांगितले.
हा दंड वसूल करण्यात यावा. या मागणीसाठी त्यांनी बुधवारी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. तसेच हा दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रांवर देखील टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्र्यांची नावे मी यापूर्वीच घोषित केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे १२ मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे भावना गवळी यांना वाचवण्यासाठी शरद पवार हे अट्टाहास का करत आहेत. असा सवालही त्यांनी केला.
माझी बोलती बंद करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ९० लोकांना मला मारण्यासाठी पाठवले होते.
मात्र, त्यांच्या १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस करणारचं. असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
हेही वाचलं का ?
पाहा व्हिडिओ- पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद