आशाताई यांनी वयाच्या ८८ वर्षी गायलं ‘हवाहवाई’साठी गाणं

आशाताई यांनी वयाच्या ८८ वर्षी गायलं ‘हवाहवाई’साठी गाणं
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आशा भोसले यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. उत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशाताई यांनी वयाच्या ८८ व्या वर्षीही गायलं आहे. हवाहवाई या मराठी चित्रपटासाठी आशाताई यांनी पुन्हा एकदा आवाज दिला आहे.

आगामी हवाहवाईतील उडत्या चालीचे गाणे आशा यांनी गायलं आहे. महेश टिळेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

"हवाहवाई" या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर यांनी केले आहे. नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलंआहे.

महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या "जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची…'.

शब्द असलेलं गाणं वयाची ८८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आशाताई भोसले यांच्या सुमधुर आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशाताई यांनी गाणी गायली आहेत.

"हवाहवाई" चित्रपटातील त्यांचे हे गाणे ऐकल्य़ानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

त्या ८८ वर्षाच्या आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशा यांनी गाणं गायलं आहे. बऱ्याच वर्षांनी आशा यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.

स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात काही नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news