जळगाव : भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे आदेश | पुढारी

जळगाव : भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे आदेश

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव काळात या काळात उपद्रवी गुन्हेगारांनी काही करू नये म्हणून भुसावळ तालुक्यातील ३२ जणांना हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी दिले आहेत.भुसावळ पोलिसांनी ३५ प्रस्ताव सादर केले होते.

यापैकी ३२ जणांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातून हद्दपार होण्याचे आदेश मिळाले.

९ ते २१ सप्टेंबर या काळात शहर व तालुका बंदीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले.

पोलीस प्रशासन आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
गणेशोत्सवास १० सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे.

उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही गर्दी, गोंधळ करू नये, शहरबंदीचे नियम आहेत.

तालुका बंदीच्या आदेशाचे पालन न करणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. असे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे म्हणाले. गणेश मंडळांमध्ये शांतता राहण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रस्तावर सादर केले आहेत. शहर व तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारवाईसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे ३५ प्रस्ताव सादर केले होते.

या ३२ जणांचा समावेश 

यातील ३२ जणांना शहरबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. यात उस्मान हसन गवळी, अनिल राजारा पारधी, संतोष गोपाळ मोरे, किशोर मनोहर चौधरी, मुकूंदा संतोष लोहार, रवींद्र दिनेश मोरे. तसेच खलील हसन गवळी, विक्की देवपुजे, अक्षय रतन सोनवणे, भूषण उर्फ टक्या मोरे, सूरज आनंदा चंडाले. राकेश राजू बार्‍हे, धीरज चंडाले अशा इसमांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, प्रमोद प्रकाश धांडे, आकाश देवरे, रत्नपाल नरवाडे, जितेंद्र शरद भालेराव, लक्ष्मण दलपत मोरे, गौरव सुनील नाले, सुभान तुकडू गवळी यांच्यासह ३२ जणांचा समावेश आहे.

प्रांताधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून अंमलबजावणी सुरू आहे.

तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नोटीसा बजाविण्यासाठी नियोजन केले आहे, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button