सिद्धार्थच्या मृत्यूनंतर जसलीन मथारू हिला आला मेसेज, आता ‘तू पण मर’ (video) | पुढारी

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर जसलीन मथारू हिला आला मेसेज, आता 'तू पण मर' (video)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: ‘बिग बॉस १३’ चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. सिद्धार्थच्या अचानक निधनाने बॉलिवूडसह अनेक चाहत्यानां जबर धक्का बसला. याच दरम्यान सध्या ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक आणि अभिनेत्री जसलीन मथारू (Jasleen Matharu) हिची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्री जसलीन मथारू हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यातून जसलीनने आपल्याला सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे सांगितले आहे.

या व्हिडिओत जसलीन हॉस्पिटलमध्ये असून तिथे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे दिसत आहे. याशिवाय जसलीन हातावर सलाईन लावल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओत जसलीनने म्हटले आहे की, ‘सिद्धार्थच्या मृत्यूनंतर मी त्याच्या घरी गेली होते. तेथे जावून अभिनेत्री शहनाज गिल आणि सिद्धार्थच्या आईला भेटले. त्या दोघींची अवस्था मला पाहवत नव्हती. तेथे सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. सिद्धार्थच्या अचानकपणे जाण्याचा सर्वांनाच धक्का बसला. तेथील परिस्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

‘तू पण मर’ हा मोबाईलवर sms आला

यानंतर मी घरी आले. पंरतु, तेथील हदय पिळवटून टाकणारी घटना सतत माझ्या डोळ्यासमोर तरंगत होती. यामुळे मी बैचेन झाले होते. याच दरम्यान मला एक मोबाईलवर एक sms आला. त्यात ‘तू पण मर’ असे लिहण्यात आले होते. यानंतर मी खूपच घाबरले आणि त्याच रात्री मला ताप आला.

यानंतर जसलीनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी १०३ डिग्री ताप भरल्याचे सांगितले.’

यानंतर जसलीनने पुढे म्हटले की, ‘सध्या माझी तब्येत ठिक आहे. मला लवकरच हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येईल .तुम्ही सर्वजण स्वत: ची काळजी घ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा.’

याआधी जसलीनने शहनाज गिलला भेटल्यानंतरची तिची अवस्था सांगितली होती. यावेळी तिने शहनाजने स्वत: चे भान हरपल्याचे सागितले होते. यावेळी ती फक्त या दृश्याकडे टक लावून पाहत असल्याचे देखील सांगितले होते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button