माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा, स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र | पुढारी

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा, स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.

राजु शेट्टी यांच्या सोबत काम करतो हा राग मनात धरून त्यांनी रविकिरण माने यांना धमकावले. याविषयी माने यांनी कासेगाव येथील पोलिस ठाण्यात सागर खोत सह अन्य साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा कारनामा बागल यांनी सांगितला.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व शिवसेना सोलापूर विधानसभा अध्यक्ष सागर तांबोळकर उपस्थित होते.

यावेळी संशयित आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी व समाजामध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या खोत यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी राज्याचे गृहमंत्री नामदार वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली. तातडीने याबाबत गृहविभागाकडून तातडीने कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे बागल यांनी सांगितले.

काय आहे नेमंक प्रकरण…

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांचे पूत्र सागर सदाभाऊ खोत आणि त्याचे साथीदार सोमवारी रात्री शस्त्रे घेऊन तांबवे येथील स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राविकिरण माने यांच्या घरात घुसले. त्यांनी माने यांना मारहाण केली.

माने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात सागर आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रवीकिरण माने यांनी फिर्याद दिली आहे.

रवीकिरण यांच्या घरी आलेल्या शेजाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

परंतू त्यांनाही खोत यांनी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत.

ते युवा स्वाभिमानीचे वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असतात.

चाकू, तलवार आणि गुप्तीचा धाक

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद झाल्यावर वाळवा तालुक्यातील स्वाभिामानीच्या काही कार्यकर्त्यांसोबत सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत नेहमी वाद होत असल्याचे दिसून आले आहे.

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रवीकिरण यांच्या घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यावर खोत यांच्यासह काहींनी तेथून पळ काढला. माने यांच्या घरातील लोक जेवत असताना हा प्रकार घडल्याचे माने यांनी फिर्यादीत सांगितले आहे.

सागर सदाभाऊ खोत यांच्याकडे चाकू, अभिजीत भांबुरे यांच्याकडे गुप्ती तर सत्यजीत कदम याच्याकडे तलवार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रवीकिरण यांच्या घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यावर खोत यांच्यासह काहींनी तेथून पळ काढला.

माने यांच्या घरातील लोक जेवत असताना हा प्रकार घडल्याचे माने यांनी फिर्यादीत सांगितले आहे.

सागर सदाभाऊ खोत यांच्याकडे चाकू, अभिजीत भांबुरे यांच्याकडे गुप्ती तर सत्यजीत कदम याच्याकडे तलवार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तुला मस्ती आली आहे का? जिवे मारल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे.

 

Back to top button